कोल्हापूर :  ईडीच्या धाकाने नव्हे, तर अजित पवार यांना एकाकी पाडायचे नसल्याने त्यांना साथ देण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी आम्ही शिंदे- फडणवीस सरकारबरोबर गेलो, असा खुलासा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर मुश्रीफ कागलमध्ये आले असता कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. काल रात्री गैबी चौकामध्ये त्यांचा नागरी सत्कार व सभा झाली. त्या वेळी ते म्हणाले, की २०१४ मध्ये कोणाचेही बहुमत न झाल्याने राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्या पाठीशी राहिले. अगणित विकासकामे किती केली याचे पुस्तक २०२४ च्या निवडणुकीत काढेन. गोरगरिबांचे काम व जिल्ह्याचा विकास याची शपथ घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मी अपरिपक्व नाही ’

एखाद्या घटनेने मी कधीही विचलित झालो नाही. फाजील आत्मविश्वास बाळगला नाही, असा टोला मंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांना लगावला.  खा. संजय मंडलिक म्हणाले, की मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतेवेळी आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांचा सल्ला घेतला होता. मुश्रीफ यांच्या वयाचा विचार केला तर ते जिल्ह्यातील ज्येष्ठ आहेत म्हणूनच ते जिल्ह्याचे पालक आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Support for the development of the state not with the fear of ed hasan mushrif claim ysh