X

पुण्यात गतीमंद मुलीची हत्या; दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं

कोथरूड परिसरातील धक्कादायक घटना

पुण्यातील कोथरूड परिसरातील डावी भुसारी कॉलनीमधील एका मतिमंद मुलींच्या संस्थेमध्ये १४ वर्षीय गतीमंद मुलीने ३३ वर्षीय गतीमंद तरुणीला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून, तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यातील कोथरुड परिसरात गतीमंद मुलांची एक विशेष शाळा आहे. त्या ठिकाणी मुलं खेळत असताना हा सर्व प्रकार घडला आहे. इमरातीच्या दुसऱ्या मजल्यावरून मुलीली खाली ढकलून देण्यात आलं.

इमारतीवरून ही मुलगी खाली पडताच घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

24
READ IN APP
X