पिंपरी पालिकेच्या वतीने शहरातील दारू विक्रेत्यांकडून मागील ६ वर्षांत ४७ कोटी रुपयांची जकात वसूल करण्यात आली होती. २०११-२०१२ या आर्थिक वर्षांत सर्वाधिक १४ कोटी रुपये वसूल करण्यात आले होते.
पिंपरी पालिकेने २००६-७ या आर्थिक वर्षांत ३ कोटी २० लाख, २००७-८ मध्ये ४ कोटी १२ लाख, २००८-९ मध्ये ४ कोटी ८४ लाख, २०१०-११ मध्ये ८ कोटी ७३ लाख, २०११-१२ मध्ये १३ कोटी ९३ लाख आणि २०१२-१३ मध्ये १३ कोटी १ लाख रुपये जकात वसूल करण्यात आली. पालिकेच्या वतीने दारूवर ८ टक्के जकात आकारण्यात येत होती. मात्र, मोठय़ा प्रमाणात जकात चुकवण्यात येत होती. जकात अधीक्षक अशोक मुंढे यांनी विक्रीकर कार्यालयाकडून दारू विक्रेत्यांच्या व्यवहाराची माहिती घेतल्याने जकातचुकवेगिरी उघड झाली. त्यानंतर, आक्रमक पवित्रा घेतल्याने विक्रेत्यांनी जकात भरण्यास सुरुवात केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 47 cr octroi collected from winesellers