‘गुणवत्ता नसेल तरी कष्ट करून यश मिळवता येते. मात्र, कष्ट करण्याची तयारीच नसेल, तर गुणवत्ता असूनही उपयोग होत नाही,’ या आईने दिलेल्या कानमंत्रालाच माझ्या यशाचे श्रेय आहे. प्रामाणिकपणे आणि पारदर्शी काम करणे हे यापुढचे ध्येय आहे,’ अशी भावना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिल्या आलेल्या पुण्याच्या अबोली नरवणे हिने व्यक्त केली आहे.
अबोलीने फग्र्युसन महाविद्यालयांतून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीचे (एमए) शिक्षण घेतले आहे. अबोलीची आई डॉ. मीनल नरवणे या यशदामध्ये कार्यरत आहेत, तर वडील सुनील नरवणे हे र्मचट नेव्हीतून निवृत्त झाले आहेत. गेल्या वर्षीही अबोलीची प्रशासकीय सेवेत निवड झाली होती. गेल्या वर्षी देशात १६३ वी रँक मिळवून भारतीय महसूल सेवेत ती दाखल झाली होती. मात्र, भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्याची इच्छा असल्यामुळे तिने या वर्षीही परीक्षा दिली होती.
अबोलीने सांगितले, ‘शाळेत असल्यापासूनच प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा होती. मला सचिन तेंडुलकर खूप आवडतो. त्याच्यावर टीका झाली तरी तो कधीही डगमगला नाही. त्याने आपल्या कामातून उत्तर दिले. माझ्यासाठी तीच प्रेरणा होती. परीक्षेत उत्तीर्ण झाले, तरी आव्हाने संपलेली नाहीत.’
संग्रहित लेख, दिनांक 5th Jul 2015 रोजी प्रकाशित
पारदर्शी काम करण्याचे ध्येय- अबोली नरवणे
‘गुणवत्ता नसेल तरी कष्ट करून यश मिळवता येते. मात्र, कष्ट करण्याची तयारीच नसेल, तर गुणवत्ता असूनही उपयोग होत नाही,’ या आईने दिलेल्या कानमंत्रालाच माझ्या यशाचे श्रेय आहे.

First published on: 05-07-2015 at 03:26 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aboli naravane upsc reaction