Ashadhi Wari 2025 जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे. देहू मध्ये सकाळपासूनच हजारो वारकरी दाखव झाले आहेत. अवघी देहू नगरी तुकोबांच्या नाम गजराने दुमदुमून गेलीय, टाळ -मृदुंगाच्या तालावर वारकरी ठेका धरत आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी गर्दी करत आहेत. आजपासून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मुख्य मंदिराजवळील शिळा मंदिराच्या समोर भाविकांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. टाळ मृदुंगाच्या गजरात तुकोबांचे नामस्मरण केले. अभंग, ओव्या म्हणत वारकरी एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहे. इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर तुकोबांच्या दर्शनासाठी वारकरी रांगेत उभे राहत आहेत.