हिंजेवडीमधील टीसीएस कंपनी मध्ये काम करणाऱ्या २३ वर्षीय संगणक अभियंत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. येथील मेगापॉलिस सिटीमध्ये काल ही घटना काल घडली. मूळचा कानपुरचा असलेल्या अभिषेक कुमार यादवने  बेडशीटने गळफास घेऊन केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर येथील नागरिकांनी याबद्दलची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र ही आत्महत्या कशासाठी केली आहे याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. मेगापॉलिस सिटी मध्ये अभिषेक हा भाड्याने राहात होता. त्याठिकाणी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.