पुणे : करोना प्रतिबंधक लशींच्या कु प्यांचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे हवालदिल झालेले लसीकरण के ंद्रांतील कर्मचारी आता त्यांना होत असलेल्या स्थानिक नागरिकांसह गुंडांच्या दमदाटीमुळे त्रस्त झाले आहेत. गुंडांकडून थेट केंद्रात घुसून लस द्या अन्यथा तोडफोड करू, अशा धमक्याही कर्मचाऱ्यांना दिल्या जात आहेत. आधीच लशींचा पुरेसा साठा होत नसल्यामुळे दुसऱ्या मात्रेसाठी आलेल्या नागरिकांनाही केंद्रांवर लस मिळणे अवघड झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरात सध्या खासगी आणि महापालिके ची मिळून १८२ केंद्रे आहेत. महापालिके ला राज्य सरकारकडून प्राप्त होणाऱ्या लसींचा या के ंद्रांना पुरवठा के ला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून लशींच्या कु प्यांचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अनेक केंद्रातील लसीकरणाची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. लसीकरणातील नियोजनाचा अभाव, लशींच्या कु प्यांचा अपुरा पुरवठा, लसीकरणासाठी नोंदणी करूनही लस मिळत नसल्यामुळे हवालदिल झालेले नागरिक, असे गोंधळाचे चित्र असतानाच आता लस घेण्यासाठी स्थानिक नागरिकांचे लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांना दमदाटीचे प्रकार सुरू झाले आहेत.

सध्या खासगी रुग्णालयातूनही लस दिली जात आहे. मात्र महापालिके च्या लसीकरण केंद्रांवर काही स्थानिक नगरसेवकांचे कार्यकर्ते केंद्रात घुसतात आणि नाव नोंदणी नसलेल्या नागरिकांना लस द्यावी, असा आग्रह केंद्रातील कर्मचाऱ्यांकडे धरत आहेत. कर्मचाऱ्यांनी त्याला नकार दिला तर त्यांना दमदाटी के ली जाते. लसीकरणाची दुसरी मात्रा घेण्यासाठी बहुतांश के ंद्रांवर गर्दी आहे. अपुरा साठा असल्यामुळे दुसऱ्या मात्रेसाठी आलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्याची सूचना आहे. मात्र दमदाटीमुळे गोंधळही वाढत असल्याची वस्तुस्थिती आहे. येरवडा, हडपसर, सहकारनगर, कोथरूड परिसरात असे प्रकार घडले आहेत. दरम्यान, नियोजनाच्या अभावामुळेही गोंधळाचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रावर सकाळी लवकर येणाऱ्या नागरिकांना टोकन दिले जाते. त्यामुळे सकाळपासूनच के ंद्रांबाहेर रांगा लागत आहेत. यात आदल्या दिवशीची यादी शिल्लक असेल तर एकही टोकन दिले जात नाही. तर काही ठिकाणी टोकन असेल आणि लसीचा साठा नसेल तर नागरिकांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले जाते. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांच्याऐवजी त्या दिवशी टोकन घेतलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. त्यामुळे पहिल्यांदाच लस घेण्यासाठी आलेल्या किं वा लशीची दुसरी मात्रा घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्येही संतापाची भावना आहे.

केंद्रांपुढील समस्या

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन प्रकारच्या लसी दिल्या जात आहेत. यातील कोविशिल्ड लस नागरिकांना प्राधान्याने दिली जात आहे. कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना याच लशीची दुसरी मात्रा दिली जात आहे. त्यामुळे पहिल्या वेळेस लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना कोव्हॅक्सिन लस दिली जात नाही.  अनेक नागरिकांना कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन लस घेतली, याची माहिती नसते. त्यामुळे मात्र काही के ंद्रांत हीच लस द्यावी, असा आग्रह धरला जात आहे. त्यातून काही वेळा वादावादीचे प्रसंग होत आहेत. अनेक नागरिक थेट केंद्रात घुसखोरी करतात आणि लस देण्यासाठी दबाव टाकतात. त्यामुळे रांगेत उभ्या राहिलेल्या किं वा टोकन घेतलेल्या नागरिकांचा रोष कर्मचाऱ्यांना ओढावून घ्यावा लागत आहे.

लसीकरण केंद्रात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. नियोजनाचा अभाव असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. काही ज्येष्ठ नागरिकांची पहिली मात्रा घेऊन ५० दिवसांहून अधिक कालावधी उलटला आहे. नागरिक सलग पाच ते सहा दिवस सतत चार ते पाच तास रांगेत थांबूनही त्यांना लस मिळत नाही. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड यापैकी कोणती लस दिली जाणार आहे, हे आधी जाहीर के ले जात नाही. याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.

– प्रा. मेधा कु लकर्णी, माजी आमदार, भाजप

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 vaccine shortage in pune zws