कुख्यात गुंड सल्या चेप्या ऊर्फ सलीम महंमद शेख याचा बुधवारी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वी सल्याच्या मणक्याला गोळी लागली होती. त्यामुळे त्याच्या शरीरात जंतूसंसर्ग होऊन तो जायबंदी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या खून प्रकरणात सल्या मुख्य आरोपी होता. त्याच्या टोळीवर संघटितपणे केलेले विविध गुन्हे सातारा व सांगली जिल्ह्यात दाखल आहेत. सुमारे ४ महिन्यांपूर्वी सातारा जिल्ह्यातील बबलू माने व गुंड बाबर खान या दोघांचा खून झाला होता. बाबर खान हा सलीम शेखचा साथीदार होता. खान व माने यांच्या खुनाच्या घटनेनंतर संघटित गुन्हेगारी अगदीच फोफावल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी निर्मूलन कायदा (मोक्का) अन्वये सल्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. ऑक्टोबरमध्ये त्याला कराडमधील कार्वेनाका परिसरातील घरातून अटक करण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2015 रोजी प्रकाशित
कुख्यात गुंड सल्या चेप्याचा पुण्यात मृत्यू
दोन वर्षांपूर्वी सल्याच्या मणक्याला गोळी लागली होती
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 23-12-2015 at 13:18 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of salya chepya in pune