पुणे शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देण्यात येणाऱ्या ‘प्रियदर्शनी इंदिरा पुरस्कारा’चे वितरण उपमहापौर आबा बागुल यांचे हस्ते झाले. या वेळी कृष्णकांत जाधव, मोहन जोशी, नीता राजपूत, लक्ष्मीताई घोडके आदी उपस्थित होते. संघाच्या ‘आधार’ स्मरणिकेचे प्रकाशनही या वेळी बागुल यांच्या हस्ते करण्यात आले.
महानगरपालिकेतर्फे निराधार वृद्ध लोकांना दरमहा ५०० रुपये देण्याची योजना येणाऱ्या बजेटमध्ये तरतूद करून घेत असल्याचे सागून बागुल म्हणाले, ज्येष्ठांच्या प्रश्नांसाठी मी सदैव कार्यरत राहीन. तसेच ज्येष्ठांना पीएमटी पास कमी दरात मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रियदर्शनी पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रतिमा इंगोले, लिज्जत पापडच्या संचालक चेतना नहार, कबड्डी सुवर्ण पदक विजेती किशोरी शिंदे, बॉक्सिंगचे जागतिक खेळाडू व पंच अजितसिंग कोचर, वृत्तपत्र विक्री व्यवसायातून कुटुंब सांभाळणाऱ्या चंपाताई करपे आदींचा सत्कार करण्यात आला.