विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सव जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतीस समर्पित पाचव्या सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक-विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची निवड करण्यात आली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे १८ ते २० डिसेंबर या कालावधीत पुण्यामध्ये हे संमेलन होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन या संमेलनाचे सहप्रायोजक आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिली. डॉ. रावसाहेब कसबे यांनी मराठी साहित्य, संस्कृती, समाजविषयक लेखन केले आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना’, ‘झोत’, ‘दलित चळवळीची वाटचाल’, ‘आंबेडकर आणि मार्क्स’, ‘आंबेडकर-तत्त्व आणि व्यवहार’, ‘हिंदूू-मुस्लीम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदूुराष्ट्रवाद’, ‘मानव आणि धर्मचिंतन’ या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि वाङ्मयीन क्षेत्रातील मूलतत्त्ववादाची परखडपणे चिकित्सा केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2015 रोजी प्रकाशित
सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रावसाहेब कसबे यांची निवड
पाचव्या सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक-विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची निवड करण्यात आली आहे.
Written by दिवाकर भावे

First published on: 20-09-2015 at 03:13 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr raosaheb kasabe elected for chairman for samyak sahitya sammelan