पुण्यातील हडपसरजवळील मैदानामध्ये बुधवारी दुपारी ग्लायडिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले. या घटनेत वैमानिक जखमी झाला आहे.
हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरवरून या विमानाने उड्डाण घेतले होते. उड्डाणानंतर थोड्याच वेळात विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्याने परिसरातील रिकाम्या मैदानावर इमर्जन्सी लॅंडिंग केले. वैमानिकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मोकळ्या मैदानात तातडीने विमान उतरविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दाट लोकवस्ती असलेल्या भागाजवळच ही घटना घडली. वैमानिकावर उपचार करण्यात आले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2016 रोजी प्रकाशित
ग्लायडरचे हडपसरजवळ इमर्जन्सी लॅंडिंग, वैमानिक जखमी
हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरवरून या विमानाने उड्डाण घेतले होते
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 09-03-2016 at 17:14 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emergency landing of a glider plane in pune