नाशिक येथील ‘अजिंठा रीसर्च-रिस्टोरेशन सोसायटी’ आणि ‘प्रसाद पवार फाउंडेशन’ यांच्या वतीने अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पुण्यात १५ ते २० ऑगस्ट दरम्यान भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात सकाळी १० ते रात्री ८ या वेळात खुले राहणार आहे.
या संस्थांच्या माध्यमातून अजिंठा लेण्यातील सर्व चित्रशिल्पांचे अधिकृत छायाचित्रण केले आहे. अजिंठा लेण्यांच्या जागतिक वारसाबाबत लोकांमध्ये जाणीव व जागृती निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. १५ ऑगस्टला सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्या वेळी भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक एम. महादेवय्या, अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, निनाद बेडेकर, गोपाळ बोधे आदी उपस्थित राहणार आहेत.