Five measles patients were found in Pimpri-Chinchwad | Loksatta

X

पिंपरी-चिंचवडमध्ये गोवरचे पाच रूग्ण; खबरदारी बाळगण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

प्रामुख्याने पाच वर्षाखालील बालकांमध्ये हा आजार आढळत असल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत पाच वर्षाखालील १६, ४७० बालकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये गोवरचे पाच रूग्ण; खबरदारी बाळगण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन
ठाणे शहरात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीमेचे आयोजन (संग्रहित छायाचित्र)

पिंपरी-चिंचवड शहरात गोवरचे पाच रूग्ण आढळून आले आहेत. या आजाराची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांच्या रहिवास क्षेत्रासह शहरभरात पालिकेने सर्व्हेक्षण सुरु केले आहे. गोवरबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

हेही वाचा- पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत आंदोलन

आकुर्डी रुग्णालय अंतर्गत चिखली कुदळवाडी भागात गोवर आजाराचे ७ संशयित रूग्ण आढळून आले. या रुग्णांची रक्ततपासणी व घशातील द्रावाची तपासणी मुंबईत हाफकिन येथील प्रयोगशाळेत करण्यात आली.

हेही वाचा- तांत्रिक बिघाडामुळे वायुदलाचे हेलिकॉप्टर बारामतीच्या शेतात; आपत्कालीन स्थितीत उतरविले, कोणालाही इजा नाही

पिंपरी पालिकेचे वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यातील इतर शहरातील आजाराचा उद्रेक लक्षात घेता गोवर संपूर्ण शहरात सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. याअंतर्गत पाच वर्षाखालील १६, ४७० बालकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. प्रामुख्याने पाच वर्षाखालील बालकांमध्ये हा आजार आढळत असल्याने कुटुंबीयांनी गोवरच्या लक्षणांवर लक्ष ठेवावे. मुलांना गोवरची लक्षणे असल्यास शाळेत आणि इतर कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये. लहान मुलांमध्ये गोवरची लक्षणं दिसल्यास घाबरुन जाऊ नये. बालकास तातडीने नजिकच्या रूग्णालयात न्यावे. घरी उपचार करू नये किंवा अंगावर काढू नये, असे आवाहन डॉ. साळवे यांनी केले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 18:55 IST
Next Story
पुणे: परवानाधारक शस्त्रे जमा करा; ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश