सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सामरिक शास्त्र विभागातर्फे (सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज) गुरुवारी (२६ मे) ‘प्रो. एस. व्ही. कोगेकर स्मृती व्याख्याना’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे या वेळी व्याख्यान होणार असून, ‘व्हॉट इट टेक्स टू मेक इन इंडिया’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
बीएमसीसी रस्त्यावरील गोखले राज्य आणि अर्थशास्त्र संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. संस्थेचे उपसंचालक एस. एच. महाजन यांनी ही माहिती दिली.
First published on: 26-05-2016 at 00:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish kuber lecture on make in india