महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या हेतूने पिंपरी महापालिकेने सुरू केलेल्या पवनाथडी जत्रेत यंदा तब्बल ७०० बचत गटांनी सहभाग घेतला आहे.
पिंपरीतील एचए कंपनीच्या मैदानावर ७ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या पवनाथडीचे उद्घाटन महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते झाले. उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप, पक्षनेत्या मंगला कदम, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती भारती फरांदे, विधी समितीचे सभापती प्रसाद शेट्टी, शिक्षण मंडळाचे सभापती विजय लोखंडे, अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम आदी उपस्थित होते. खासदार शिवाजीराव आढळराव यांनीही जत्रेत भेट देऊन स्टॉलची पाहणी केली.  
महापौर म्हणाल्या, पवनाथडीसारख्या उपक्रमातून महिला सक्षमीकरणाची चळवळ अधिक गतीमान होईल. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच व्याख्यानांचे आयोजनही करण्यात आले आहे. उद्घाटनानंतर ‘ही दौलत महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रास्ताविक सतीश कुलकर्णी यांनी केले. मंदाकिनी ठाकरे यांनी आभार मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge response to pawanathadi fair