पुण्यात खराडी बायपास रोडवर पेरूचे भाव कमी केले नाही यामुळे विक्रेत्यावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. प्रशांत जाधव वय 30 रा. मांजरी असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. आरोपी मयूर खरगुंळे फरार आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, खराडी बायपास रोडवर दुपारच्या सुमारास प्रशांत जाधव हे पेरू विक्रीसाठी बसले होते. त्यावेळी आरोपी मयूर खरगुंळे पेरू खरेदी करण्यासाठी आला होता. तेव्हा आरोपी मयूर खरगुंळे हा ज्या भावात पेरू मागत होता तो भाव प्रशांत जाधव यांना परवडत नव्हता, त्यामुळे पेरू मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आरोपी मयूर खरगुंळे याने प्रशांत जाधव याच्या पोटावर, मांडीवर चाकूने सपासप वार केले आणि तेथून पसार झाला. या घटनेनंतर जखमी प्रशांत जाधव यांना रूग्णालयात दाखल करून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे चंदननगर पोलिसांनी सांगितले.