पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील ९ वर्षांच्या सिंहाचा पक्षाघातामुळे मृत्यू झाला. गेल्या महिन्याभरापासून हा सिंह आजारी होता. या सिंहाचा मृत्यू शुक्रवारी झाल्याचे समजते आहे. तेजस असे या सिंहाचे नाव होते. गुजरातच्या सक्करबाग प्राणी संग्रहालयातील सिंह तेजस आणि सिब्बू यांना अडीच वर्षापूर्वी पुण्यातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आणण्यात आले होते. आशियाची सिंहाची तेजस आणि सिब्बू ही महाराष्ट्रातली एकमेव जोडी होती. या दोघांनाही पाहण्यास पर्यटक येत. मात्र गेल्या महिन्याभरापासून हा सिंह आजारी होता. शुक्रवारी या सिंहाचा मृत्यू झाला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 10-08-2019 at 15:06 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lion death in rajiv gandhi zoo in pune because of paralysis scj