अपरिहार्य कारणामुळे रविवारचा कार्यक्रम रद्द

‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’च्या चौथ्या वार्षिक अंकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ‘अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक – कुठे आणि कशी?’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी ( ५ मार्च ) करण्यात आले होते. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला आहे. आता गुंतवणूकदारांचा हा मेळावा गुरूवारी (९ मार्च) होणार आहे.

अर्थसंकल्पानंतर अर्थनियोजन कसे करावे, कुटुंबाच्या आर्थिक अंदाजपत्रकाला लाभाची दिशा कशी द्यावी याचे मार्गदर्शन करणाऱ्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रविवारी (५ मार्च) सायंकाळी साडेपाच वाजता मयूर कॉलनी येथील बालशिक्षण मंडळाच्या सभागृहात होणार होता.  मात्र त्या सभागृहात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे तेथील विद्युत पुरवठा बंद झाला असून त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला आहे.

‘बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक – कुठे आणि कशी?’ हा कार्यक्रम आता गुरूवारी (९ मार्च) सायंकाळी साडेपाच वाजता बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात होणार आहे.

या कार्यक्रमात ‘गुंतवणूक आणि करबचत’ या विषयावर सुहास कुलकर्णी, ‘गुंतवणूक करण्यापूर्वी’ या विषयावर भरत फाटक, ‘शेअर बाजारात गुंतवणूक करताना’ या विषयावर नीरज मराठे, ‘म्युच्युअल फंडातील गुंतवणूक’ या विषयी अभय दांडेकर मार्गदर्शन करणार आहेत. गजराज बिल्डर्स, वास्तू रविराज हे या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत, तर पॉवर्ड बाय पार्टनर एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड, केसरी टूर्स, पुराणिक बिल्डर्स असून, बँकिंग पार्टनर जनकल्याण सहकारी बँक हे आहेत.

‘अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक – कुठे आणि कशी?’

’ कुठे- बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड

’ कधी- गुरूवार, ९ मार्च, सायंकाळी ५.३० वाजता.

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.