सनई-चौघडय़ाचे मंगलमय सूर.. नयनरम्य रंगावलीच्या पायघडय़ा.. ताशाच्या
श्री कसबा गणपती
महापौर चंचला कोद्रे यांनी पुष्पहार अर्पण केल्यावर मंडईतील टिळक पुतळ्यापासून
श्री तांबडी जोगेश्वरी
नगारावादनाचा गाडा ग्रामदैवत श्री तांबडी जोगेश्वरीच्या मिरवणुकीमध्ये अग्रभागी होता. संगीताच्या तालावर नर्तन करणारे दोन अश्व गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होते. नऊवारी आणि नथ अशा पारंपरिक पेहरावातील अश्वारुढ युवतींचे पथक, देशभक्तिपर आणि भक्तिगीतांच्या सुरेल सुरावटी साकारणारे न्यू गंधर्व बँडपथक, वेगेवेगळ्या तालांवर गणेशभक्तांना मंत्रमुग्ध करणारी ‘शिवमुद्रा’ आणि ‘ताल’ ही दोन ढोल-ताशा पथके या मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. पारंपरिक पालखीमध्ये विराजमान श्रींच्या मूतीचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली होती. मंडळाचे कार्यकर्ते हेच या पालखीचे भाई झाले होते.
गुरुजी तालीम मंडळ
लक्ष्मी रस्त्यावर प्रथम गुलाल उधळणारे मंडळ असा लौकिक असलेल्या श्री गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या मंडळाने यंदा मर्यादित प्रमाणात गुलालाचा वापर केला. सुभाष सरपाले यांनी आकर्षक फुलांची सजावट केलेल्या राज सिंहासन रथामध्ये मूषकस्वार गणराय विराजमान झाले होते. लोकसेवा प्रतिष्ठानच्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पथकातील विद्यार्थ्यांनी विविध प्रांतातील लोकनृत्यासह साहसी क्रीडाप्रकारांची प्रात्यक्षिके सादर केली. तालासाठी प्रसिद्ध असलेली ‘नादब्रह्म’ आणि ‘शिवगर्जना’ ही दोन ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांचा या मिरवणुकीमध्ये सहभाग होता.
तुळशीबाग मंडळ
कार्यकर्त्यांनी आकर्षक फुलांची सजावट केलेल्या पुष्परथामध्ये श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा मानाचा चौथा गणपती विराजमान झाला होता. पुणे डॉक्टर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आरोग्यविषयक जनजागृती करणारा डॉक्टरांचा सहभाग असलेला आरोग्य रथ मिरवणुकीच्या अग्रभागी होता. त्याचप्रमाणे सहजयोग परिवारचे कार्यकर्ते योग-ध्यानधारणा आणि प्राणायाम याविषयी जागृती करणारे फलक हाती घेत सहभागी झाले होते. यातील काही कार्यकर्त्यांनी पथनाटय़ सादर केले. गजलक्ष्मी, स्व-रूपवर्धिनी आणि हिंदू तरुण मंडळ ही तीन ढोल-ताशा पथके या मिरवणुकीचे आकर्षण केंद्र ठरली.
केसरीवाडा गणपती
टिळक रस्त्याचा शिरस्ता मोडून ‘केसरीवाडा’ हा मानाचा पाचवा गणपती सलग दुसऱ्या वर्षी लक्ष्मी रस्त्याने मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता. बिडवे बंधू यांचा नगारावादनाचा गाडा मिरवणुकीच्या अग्रभागी होता. शौर्य, शिवमुद्रा आणि श्रीराम पथक ही ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. पारंपरिक पालखीमध्ये विराजमान झालेली श्रींची मूर्ती सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. भर पावसामध्येही ढोल-ताशा वादनाचा आनंद लुटणारे वादक आणि गणपती बाप्पा मोरया हा गजर करणारे कार्यकर्ते यांच्या उत्साहामुळे मिरवणुकीमध्ये रंग भरला गेला. केसरीवाडा गणपतीचे विसर्जन यंदा अर्धा तास आधीच झाले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2013 रोजी प्रकाशित
मानाच्या गणपतींच्या वैभवी,दिमाखदार मिरवणुका
दुपारी झालेल्या मुसळधार पावसामध्येही ढोल-ताशा वादनाचा आनंद लुटणारे उत्साही वादक कलाकार .. अशा जल्लोषपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 20-09-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Magestic procession of ganesh immersion