वीज सेवेबाबतच्या तक्रारी दाखल करण्यासाठी महावितरणच्या कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना एकदाच ग्राहक क्रमांक सांगावा लागणार आहे. ग्राहक क्रमांक सांगून स्वत:चे कोणतेही तीन संपर्क क्रमांक ग्राहकांनी महावितरणकडे नोंदवायचे आहेत. त्यानंतर या तीन क्रमांकांपैकी कोणत्याही क्रमांकावरून ग्राहकाने दूरध्वनी केल्यास त्यांना आपले नाव पुन्हा सांगावे न लागता केवळ तक्रारीचा तपशील सांगावा लागेल.
वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच वीज सेवेबाबतच्या इतरही तक्रारी करण्यासाठी किंवा वीज सेवेबाबत माहिती मिळवण्यासाठी महावितरणने १८००२००३४३५ आणि १८००२३३३४३५ हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. राज्यातील ग्राहकांसाठी हे दूरध्वनी क्रमांक चोवीस तास सुरू राहणार असून इतर स्थानिक तक्रार निवारण केंद्रे फेब्रुवारीपासून बंद करण्यात आली आहेत.
तक्रार नोंदवताना ग्राहकाने आपला ग्राहक क्रमांक सांगणे आवश्यक असते. मात्र आता ग्राहकांना तक्रारीच्या प्रत्येक वेळी हा ग्राहक क्रमांक सांगावा लागणार नाही. नवीन सुविधेनुसार ग्राहकाला महावितरणकडे आपले कोणतेही तीन दूरध्वनी क्रमांक नोंदवण्याची मुभा आहे. तसेच आपला ग्राहक क्रमांकही ग्राहकाने एकदाच नोंदवायचा आहे. त्यानंतर नोंदवलेल्या तीन दूरध्वनी क्रमांकांपैकी कोणत्याही क्रमांकावरून दूरध्वनी केल्यास ग्राहकाला आपले नाव, पत्ता, ग्राहक क्रमांक ही माहिती सांगावी न लागता केवळ तक्रारीचा तपशील विचारला जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2014 रोजी प्रकाशित
महावितरणकडे ग्राहक क्रमांक एकदाच नोंदवायची सुविधा
महावितरणच्या कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना एकदाच ग्राहक क्रमांक सांगावा लागणार आहे. ग्राहक क्रमांक सांगून स्वत:चे कोणतेही तीन संपर्क क्रमांक ग्राहकांनी महावितरणकडे नोंदवायचे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-05-2014 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran mseb complaint contact number