विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर महिलेला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईतील एकाविरुद्ध कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हितेंद्र महावीर घोष (वय ४०, रा. रचना मंदिर सोसायटी, सांताक्रुझ, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. महिलेने यासंदर्भात कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत महिला अविवाहित आहे. तिचा व्यवसाय आहे. सन २०१४ मध्ये तिची ‘शादी डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून घोष याच्याशी ओळख झाली होती. घोष याने तिला विवाहाचे आमिष दाखविले होते. त्यानंतर घोष पुण्यात आला. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर महिला घोष याच्या मुंबईतील घरी गेली होती. घोष याने तिच्यावर बलात्कार केला.
महिलेने त्याच्याकडे गेल्या महिन्यात विवाहासंदर्भात विचारणा केली. त्या वेळी घोष याने नकार दिला. तिने कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक एन.एन.गायकवाड तपास करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2016 रोजी प्रकाशित
विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार
घोष याने तिला विवाहाचे आमिष दाखविले होते. त्यानंतर घोष पुण्यात आला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 20-06-2016 at 01:17 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man raped woman on false marriage promise