अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे विशेष संगीत संमेलन आणि संगीत शिक्षण अधिवेशन शनिवारपासून (२६ डिसेंबर) तीन दिवस छत्तीसगढ राज्यातील कोरबा येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदीर्घ आणि यशस्वी सांगीतिक कार्याची नोंद घेऊन पं. अजय पोहनकर यांना या संमेलनात ‘मानद संगीताचार्य’ या सर्वोच्च पदवीने गौरविण्यात येणार आहे. तीन दिवसांच्या या संमेलनात पं. अजय पोहनकर यांच्या गायनाबरोबरच यशवंत वैष्णव यांचे एकल तबलावादन, प्रज्ञा मिश्र यांचे गायन, पं. असीम चौधरी यांचे सतारवादन, सम्राट पंडित यांचे गायन, पं. बिरजू महाराज यांच्या शिष्यांचे कथक नृत्य होणार असून पं. विकास कशाळकर, डॉ. सुधा पटवर्धन आणि अजय हेडावू यांचे सप्रयोग व्याख्यान होणार आहे, असे गांधर्व महाविद्यालय मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. माधव वसेकर यांनी कळविले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2015 रोजी प्रकाशित
पं. अजय पोहनकर यांना मानद संगीताचार्य पदवी
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे विशेष संगीत संमेलन आणि संगीत शिक्षण अधिवेशन छत्तीसगढ राज्यातील कोरबा येथे आयोजित केले आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 24-12-2015 at 03:13 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manad sangitacharya award to pandit ajay pohankar