पुणे : मेट्रो प्रकल्पाच्या कामाअंतर्गत ससून येथील जलवाहिनी बुधवारी फुटल्याने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे जलमंदीर तसेस ससून जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी (१२ मे) बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (१३ मे) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापािलकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
घोरपडी, डीफेन्स, कॅम्प, पुणे कॅन्टोन्मेंट, सोमवार पेठ, जुना बाजार परिसर, मंगळवार पेठ, कोरेगांव पार्क, ताडीवाला रस्ता, पुणे रेल्वे स्थानक परिसर, ससून रुग्णालय परिसर, पाटील इस्टेट, वाकडेवाडी परिसर, शिवाजीनगर जुनी पोलीस लाईन परिसर, पुणे विद्यापीठ रस्ता परिसर या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.