आयसिसमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या अब्दुल रौफ या व्यक्तीला मंगळवारी सायंकाळी पुण्यात अटक करण्यात आली . राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून अब्दुल रौफला ताब्यात घेतले. गुप्तचर विभागाच्या माहितीवरुन एनआयएने ही कारवाई केली. रौफ हा भारतातून आयसिससाठी तरूणांची भरती करण्याचे काम करत होता.
इस्माईल अब्दुल रौफ हा कर्नाटकच्या भटकळ इथला मूळचा रहिवासी आहे. रौफ पुणे विमानतळावरुन दुबईला जात होता. तिथून तो आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियात जाणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून एनआयएची अब्दुल रौफच्या मागावर होती. रौफ इंटरनेट चॅटच्या माध्यमातून आयसिसमध्ये भरती करण्यासाठी तरुणांचा शोध घेत होता. काही महिन्यांपूर्वी आयसिससाठी काम करीत असल्याच्या संशयावरून देशभरात विविध ठिकाणी १४ जणांना अटक करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nia arrested abdul rauf who handle isis recruitment network in india