रेल्वे आरक्षणाची अंतिम यादी झाल्यानंतरही काही आसने शिल्लक राहिल्यास त्या जागांसाठी पुणे रेल्वे स्थानकामध्ये तातडीच्या आरक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुणे स्थानकावरून गाडी सुटण्याच्या एक तास आगोदर स्थानकावरील तिकीट खिडकी क्रमांक २८ व २९ येथे ही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. झेलम एक्स्प्रेस, ज्ञानगंगा एक्स्प्रेस, आझादहिंद एक्स्प्रेस, पुणे-पटना एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इन्टरसिटी एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, पुणे-जयपूर एक्स्प्रेस, पुणे-जोधपूर एक्स्प्रेस, पुणे-लखनौ एक्स्प्रेस, पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस, पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे-लातूर एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, पुणे-अिहसा एक्स्प्रेस आदी गाडय़ांबाबत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.