महापालिकेच्या वतीने सातववाडी-हडपसर येथे बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल ट्रॅकचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी करण्यात आले. त्याबरोबरच प्रभाग क्रमांक ४४ मधील विविध विकासकामांचे, तसेच तुकाई टेकडी येथील पाण्याच्या टाकीचे उद्घाटनही पवार यांनी केले.
स्थानिक नगरसेविका वैशाली बनकर या महापौर असताना त्यांनी सायकल ट्रॅकचे नियोजन केले होते. सातववाडी-हडपसर येथील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरावा तसेच अन्य जे नागरिक सायकल वापरतात त्यांनाही उपयोग व्हावा, या दृष्टीने हा सायकल ट्रॅक बांधण्यात आला असून तो आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्यात आला आहे. सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हा ट्रॅक उपयुक्त ठरेल. उपमुख्यमंत्री पवार यांनी सायकल चालवून या ट्रॅकचे उद्घाटन केले. स्थानिक नगरसेवक विजय देशमुख, वैशाली बनकर, तसेच शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रवी चौधरी, सुनील बनकर, नंदा लोणकर, विजया वाडकर आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opening of cycle track at satavvadi hadapsar