Premium

विरारमधील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणात भाई ठाकूरसह तिघे निर्दोष

विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणात जयेंद्र उर्फ भाई ठाकूर याच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले.

Suresh Dubey murder case
विरारमधील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणात भाई ठाकूरसह तिघे निर्दोष (image – pixabay)

पुणे : विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणात जयेंद्र उर्फ भाई ठाकूर याच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले. ‘टाडा’ कायद्याअंतर्गत दाखल असलेला देशातील शेवटच्या खटल्याचा निकाल न्यायालयाने दिला. दुबे खून प्रकरणात १७ आरोपींना अटक करण्यात आली होती. या खटल्यात न्यायालयाने सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयंत उर्फ भाई विष्णू ठाकूर, दीपक ठाकूर, गजानन पाटील अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या खटल्यात नरेंद्र भालचंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, उल्हास राणे, पॅट्रीक तुस्कानो, राजा जाधव, माणिक पाटील यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

हेही वाचा – पुणे: चेकवर बनावट सही करून पतीने काढले पत्नीच्या बँक खात्यातून लाखो रुपये

विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा नऊ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वे स्थानकावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी टाडा (टेररिस्ट अँड डिस्ट्रप्टीव्ह ॲक्टव्हीज (प्रिव्हेंन्शन) ॲक्ट) नुसार कारवाई केली होती. दुबे खून खटल्यात २००४ मध्ये टाडा कायद्यातील विविध कलमे तसेच बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी (आर्मस् ॲक्ट) आरोप निश्चित करण्यात आले होते.

हेही वाचा – भोसरी पोलिसांची वेगळीच डोकेदुखी; पोलीस हद्दीत धुळ खात पडलेल्या १९८६ पासूनच्या मूळ गाडी मालकांचा घेत आहेत शोध

या खटल्यात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. सतीश मिश्रा यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाकडून ॲड. सुदीप पासबोला, ॲड. सुधीर शहा, ॲड. रोहन नहार, ॲड. प्रीतेश खराडे, ॲड. सचिन पाटील, ॲड. रोहित तुळपुळे यांनी बाजू मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Order to release bhai thakur along with three in virar builder suresh dubey murder case pune print news rbk 25 ssb

First published on: 24-05-2023 at 14:59 IST
Next Story
पुणे: दांडेकर पूल भागात एकाच्या डोक्यात दगड घालून खून