कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, तसेच तेथील तलावात उभारण्यात
कात्रज प्राणी संग्रहालयाला तसेच तेथील तलाव व अन्य प्रेक्षणीय स्थळांना दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. महापालिकेने केंद्र सरकारच्या मदतीने कात्रज तलावाच्या सुशोभीकरणाचे काम केल्यामुळे कात्रज तलाव हे नवे आकर्षण तयार झाले आहे. त्या बरोबरच तेथील संगीत कारंजाचा सायंकाळी होणारा प्रयोगही नेत्रदीपक असून तो पाहण्यासाठी देखील शेकडो प्रेक्षकांची रोज गर्दी होते. या सर्व आकर्षणात आता एका छोटय़ा फुलराणीची भर तेथे पडेल. ही छोटी रेल्वे तयार करण्याचे काम सध्या अमरावती येथे सुरू आहे. रेल्वेची बांधणी, तसेच या रेल्वेसाठी साडेचारशे मीटर लांबीचा लोहमार्ग बांधणे आणि एक छोटे स्टेशन व बोगद्याची बांधणी अशा दोन टप्प्यात या कामांना महापालिकेने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यातील काम सुरू आहे, तर स्टेशन बांधणी आणि बोगदा व अन्य बांधकामे लवकरच सुरू होत आहेत. संपूर्ण योजनेसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च येईल.
स्थानिक नगरसेवक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेतील गटनेता वसंत
कात्रज तलाव व परिसरात पर्यटकांसाठी आकर्षण ठरतील अशी अनेकविध आकर्षणे तयार झाली आहेत. या ठिकाणांची माहिती या फुलराणीत बसून बालगोपाळांना आणि नागरिकांनाही घेता येईल. त्या त्या ठिकाणाजवळून ही रेल्वे जात असताना त्याची माहिती रेल्वेतील डब्यात ऐकवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे समोर प्रेक्षणीय ठिकाण पाहात असतानाच त्याची माहिती रेल्वेच्या प्रवासात मिळेल. रेल्वेच्या डब्यांची विशेष सजावट व रचना करण्यात आली आहे. हे डबे दोन्ही बाजूंनी खुले असतील. त्यामुळे संपूर्ण परिसर पाहात पाहात ही सफर करता येणार आहे.
वसंत मोरे
स्थानिक नगरसेवक