पिंपरी-चिंचवड : दिघीत १३ जणांच्या टोळक्याचा तलावारी, कोयते हाती घेऊन मध्यरात्री धुडगुस!

काही जणांवर हल्ला करत, २० ते २५ वाहनांचीही तोडफोड करण्यात आली ; चार जण ताब्यात, नऊ जण फरार

पिंपरी-चिंचवडमध्ये किरकोळ कारणावरून दिघी येथे तलवार आणि कोयत्याने काही जणांवर वार करत २० वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं असून नऊ जण फरार आहेत. या भयानक घटनेचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला असून यावर पोलिसांकडून काहीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. 

घटने प्रकरणी अर्जुनसिंग, संग्रामसिंग बाधा, अभिजित घोरपडे, सुरजितसिंग बाधा, करणसिंग, सोन्या, संगीता कौर, गजलसिंग बाधा, हुकूमसिंग बाधा, अजयसिंग टाक आणि इतर तीन अशा एकूण १३ जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा १३ जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत दिघी परिसरातील २०- २५ वाहनांची तोडफोड केली. तर, काही जणांवर कोयत्याने आणि तलवारीने वार केल्याचं कळतंय. या प्रकरणी दिघी पोलीस स्पष्ट बोलत नाहीत. माहिती देण्यास टोलवाटोलवी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार कबूतरबाजीवरून भांडण झाल्याचं पुढे येत असून यातूनच वाहनांची तोडफोड आणि कोयते आणि तलवारीने वार करण्यात आले आहेत. 

नागिराकांमध्ये भीतीचे वातावरण –

आयर्नमॅन, डॅशिंग पोलीस ऑफिसर अशी ख्याती असलेले पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारताना, शहरातील नागरिक भयमुक्त राहतील अशी हमी दिली होती. मात्र, ते येऊन वर्ष उलटले मात्र गुन्हेगारी आटोक्यात आलेली नाही. सातत्याने पत्रकार परिषदांमधून कायम प्रकाशझोतात राहणाऱ्या आयुक्तांच्या राज्यात नागरिकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचं चित्र दिघी येथील घटनेवरून अधोरखित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pimpri chinchwad a group of 13 people in dighi attacked at midnight with swords and sickles msr 87kjp

Next Story
‘नू’ किंवा ‘क्षी’ऐवजी ओमिक्रॉन नामकरण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी