पिंपरीत कंपनीला शॉर्टसर्किटमुळे आग ; ५० लाखांचे नुकसान!

काही किलोमीटरवरून आकाशात दिसत होते धुरांचे लोट

पिंपरी-चिंचवड शहरातील डॉ. अटलांटा बेग या कंपनीत भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. आग मोठी असल्याने काही किलोमीटरवरून धुरांचे लोट दिसत होते. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या पाच अग्निशमन दलाच्या वाहनांनी घटननास्थळी जाऊन दीड तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी पाच वाजेच्या सुमारास पिंपरीतील मोरवाडी येथे असणाऱ्या डॉ. अटलांटा बेग या कंपनीत शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली होती. आज शनिवार असल्याने काही कामगारांना सुट्टी होती. तर, काही कामगार कंपनीत होते. मात्र, आगीच्या घटनेत सुदैवाने जीवितहानी किंवा कामगार जखमी झालेले नाहीत. कंपनीतील रासायनिक माल जळून खाक झाला असून तब्बल ५५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती कंपनीने अग्निशमन विभागाला दिली आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pimpri company fires due to short circuit loss of rs 50 lakh msr 87 kjp

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी