राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघचालक प्रा. कचेश्वर सहाणे (वय ७२) यांचे गुरुवारी पहाटे अहमदनगर येथे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले.
सहाणे यांनी गेली तीस वर्षे रा. स्व. संघाच्या महाराष्ट्र प्रांताच्या विविध जबाबदाऱ्यांबरोबरच भारतीय किसान संघ, वाल्मिकी सेवा प्रतिष्ठान, राष्ट्रहित संवर्धन मंडळ, अशा संस्थांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. विद्या प्रतिष्ठान संचलित डॉ. डेहगेवार प्रतिष्ठानचे ते उपाध्यक्ष होते. नगर येथील न्यू आर्टस्, सायन्स, कॉमर्स महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. मनमाड येथील संघप्रचारक नाना ढोबळे यांच्यामुळे त्यांनी संघकार्याला वाहून घेतले.
सहाणे यांनी पारंपारिक शेतीतही अनेक प्रयोग केले. ग्रामीण भागातील तरुणांना एकत्र केले व काही स्वयंरोजगाराचे प्रयोगही राबवले.