पुण्याची वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही कोविडच्या परिस्थितीत होणार नाही. मानाच्या गणपती मंडळांनी समाजहितासाठी उत्सव मंडपातच गणपती विसर्जन करायचा निर्णय यंदाही घेतला आहे. परंपरेनुसार मानाचा पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन सकाळी ११ वाजता होणार असून, त्यानंतर ४५ मिनिटानंतर क्रमवारीनुसार होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्री कसबा गणपती ११ वाजता, तांबडी जोगेश्वरी ११.४५ वाजता, गुरुजी तालीम १२.३०, श्री तुळशीबाग १.१५ मिनिटांनी, केसरी वाडा २ वाजता, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती २.४५ मिनिटांनी विसर्जित होईल.

श्री तुळशीबाग मंडळाने आकर्षक गजकुंड केलेले असून त्यावर फुलांची सजावट असणार आहे. पारंपरिक धार्मिक पद्धतीने उत्सव मंडपात गणरायाचे विसर्जन मंडळाचे अध्यक्ष विकास पवार यांच्या शुभहस्ते उपाध्यक्ष विनायक कदम यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, असल्याचे कळवण्यात आले आहे.

पुणे : विसर्जनाच्या दिवशी शहर आणि परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार

वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यनगरीतील गणेशोत्सवावर करोनाचे सावट असून पोलिसांकडून उत्सवासाठी नियमावली लागू करण्यात आली आहे. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, रस्ते, पदपथांवर मूर्ती विक्री स्टॉल लावू नयेत, तसेच प्रतिष्ठापना आणि विसर्जन सोहळ्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना यंदाही परवानगी देण्यात येणार नाही, आदीचा समावेश असलेली नियमावली पोलिसांनी तयार केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune ganeshotsav ganesh mandals took this decision regarding immersion procession msr 87 svk