मुलाच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी ८० वर्षीय माऊली पाणी पुरी, भेळ विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत पाहून अगदी तरुण ही लाजतील अशा प्रकारे ८० वर्षीय आजी काम करतात. चंद्रभागा शिंदे असे ८० वर्षीय आजींचे नाव आहे.

आजी म्हणतात…आई काळजी करते म्हणून मुलगा राजेंद्र त्यांना किती कर्ज आहे ते सांगत नाही. मुलगा म्हणतोय काम करू नकोस, पण माझा जीव मुलात आहे. राहवत नाही असे आजींनी सांगितले. कर्जातून तो लवकर मुक्त व्हावा यासाठी काम करत आहे असे म्हणत असताना आजींना गहिवरून आले होते. बेरोजगार तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे. जेणेकरून त्यांना दोन वेळचे जेवण मिळेल असेही त्या बोलताना म्हणाल्या.