रिक्षाच्या भाडेवाढीनंतर रिक्षाचालकांना रिक्षाचे इलेक्टॉनिक मीटर प्रमाणीकरण बंधनकारक केले असले, तरी प्रमाणीकरणाच्या सुविधा पुरेशा नसून काही ठिकाणी प्रमाणीकरणासाठी ठरलेल्या किमतीपेक्षा अधिक किंमत आकारून रिक्षाचालकांची अडवणूक केली जात आहे, असा मुद्दा आम आदमी पक्षाने मांडला आहे. १४ ऑगस्टपूर्वी सर्व रिक्षांचे मीटर प्रमाणीकरण पूर्ण होणे शक्य नसून त्यांना मुदत वाढवून द्यावी, अशी मागणीही पक्षातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली. पक्षाचे राज्य संयोजक सुभाष वारे, पुणे शहर रिक्षा सेलचे समन्वयक असगर बेग यांच्यासह इतर रिक्षाचालक या वेळी उपस्थित होते.
पुण्यातील रिक्षांचे मीटर तीन वेगवेगळ्या कंपन्यांचे आहेत. त्यापैकी एका कंपनीच्या मीटरच्या प्रमाणीकरणासाठी ठरलेल्या ३९० रुपयांपेक्षा अधिक – म्हणजे सहाशे रुपये आकारले जातात. तसेच ठरलेले पैसेच देण्याचा आग्रह धरल्यास किंवा जेवढे पैसे द्यावे लागतील त्याची पक्की पावती मागितल्यास मीटर प्रमाणीकरण करणे नाकारले जाते, अशी तक्रार रिक्षाचालकांनी या वेळी मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw calibration aap demand