पुणे जिल्ह्यातील चाकण-शिक्रापूर मार्गावर झालेल्या दुचाकी व अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघे ठार झाले. हा भीषण अपघात सोमवारी रात्री शिक्रापूर गावाजवळ घडला. हणमंत ठाकर हे दुचाकीवरून पत्नी व मुलासह गावाकडे निघाले होते. गतिरोधक दिसल्याने त्यांनी अचानक दुचाकीचा ब्रेक दाबला. त्याचवेळी भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने ठाकर यांच्या दुचाकीला मागून  जोराची धडक दिली. यात दुचाकीवर बसलेले हणमंत ठाकर त्यांची पत्नी व मुलगा हे ठार झाले. या रस्त्यावर यापूर्वीही अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road accident at chakan shikrapur road three dead