‘विशेष’ या सामाजिक संस्थेने शारीरिकदृष्टय़ा अपंग व कमी ऐकू येणाऱ्या व्यक्तींसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. १६ जून रोजी (रविवार) गणेश खिंड रस्त्यावरील बालकल्याण संस्थेत सकाळी १० ते १ या वेळेत हा मेळावा होणार आहे.
३२ वर्षांखालील कोणत्याही शाखेच्या (कला, वाणिज्य, विज्ञान, बी- टेक इ.) पदवीधर व्यक्ती या मेळाव्याचा लाभ घेऊ शकणार आहेत. नोकरीचा अनुभव असणाऱ्यांबरोबरच विनाअनुभव उमेदवारही मेळाव्यात सहभागी होऊ शकणार आहेत.
उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती बरोबर घेऊन येणे आवश्यक आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही, असे संस्थेने कळवले आहे. अधिक माहितीसाठी ९१६७१११३९७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2013 रोजी प्रकाशित
अपंग, कर्णबधिर व्यक्तींसाठी रविवारी नोकरी मेळावा
‘विशेष’ या सामाजिक संस्थेने शारीरिकदृष्टय़ा अपंग व कमी ऐकू येणाऱ्या व्यक्तींसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

First published on: 15-06-2013 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Service rally for disabled and deaf persons by vishesh