हिंजवडीत उसाच्या शेतात बिबटय़ाचे तीन बछडे

आयटी हब अशी ओळख असलेल्या हिंजवडीलगत नेरे गावातील उसाच्या शेतात बिबटय़ाचे तीन बछडे आढळून आले आहेत.

पिंपरी: आयटी हब अशी ओळख असलेल्या हिंजवडीलगत नेरे गावातील उसाच्या शेतात बिबटय़ाचे तीन बछडे आढळून आले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती वन अधिकाऱ्यांना कळवली व त्यानंतर वन विभागाने बछडय़ांना ताब्यात घेतले आहे. नेरे गावातील मोहन जाधव यांच्या शेतातील ऊस तोडणीचे काम सुरू आहे. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ऊस तोडणाऱ्या कामगारांना शेतात बिबटय़ाचे तीन बछडे असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ जाधव यांना ही माहिती कळवली. जाधव यांनी वन विभागाला कळवले. तासाभराने वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी बछडे ताब्यात घेतले. या वेळी बघ्यांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. वन विभागाच्या वतीने पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

यासंदर्भात, तुकाराम जाधव यांनी सांगितले,की जवळपास तीन वर्षांपासून बिबटय़ाचा वावर या परिसरात आहे. बिबटय़ाने कोणा मनुष्यावर हल्ला केला नाही. मात्र, ठरावीक अंतराने त्याने गावातील जनावरे व कोंबडय़ांना मारले होते. ऊस तोडणीचे काम सुरू असताना सोमवारी बिबटय़ाचे बछडे आढळून आल्याची माहिती आम्ही वन विभागाला कळवली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three leopard cubs sugarcane field ysh

Next Story
राज्याला पुन्हा हुडहुडी ; उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट, राज्यभरात आणखी तीन दिवस गारठा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी