शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडपांमुळे वाहतुकीची मोठय़ा प्रमाणात कोंडी होत आहे. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने आखून दिलेले नियम मोडून असे मंडप उभे राहिले आहेत. तरीसुद्धा महापालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, कोणतीही कारवाई होत नाही आणि नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
त्यापैकी काही प्रातिनिधिक मंडळांचे मंडप..
म्हात्रे पुलाजवळील बाल शिवाजी तरूण मंडळाचा मंडप रस्त्याच्या वळणावर आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो.
बाजीराव रस्त्यावरील नातू बाग मंडळाच्या मंडपाने निम्म्याहून अधिक रस्ता व्यापला आहे. त्यामुळे अतिशय वर्दळीच्या या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड प्रमाणात कोंडी होते.
जंगली महाराज रस्त्यावरील गरवारे उड्डाण पुलाजवळ नवचैतन्य मंडळाचा हा मंडप. मंडपासमोरच पीएमपीचे बस स्थानक आहे. या ठिकाणाहून वळून फग्र्युसन रस्त्याकडे जाताना मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते आहे.