बांधकाम सुरु असलेल्या एका मंदिराच्या सभामंडपाचा स्लॅब कोसळल्याने त्याखाली अडकून एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर इतर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पिंपळे गुरव येथील रहिवाशी भागात ही घटना घडली आहे. जखमीला जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
#UPDATE: Two labourers, who have been injured in a slab collapse incident at an under construction temple site near Pimple Gurav residential area in Pune, succumb to their injuries. The condition of the other two labourers injured in the incident remains serious. https://t.co/f1kvSeoB1a
— ANI (@ANI) February 20, 2019
सुत्रांच्या माहितीनुसार, चिदम्मा पुजारी (वय ३०), मंतोष संजीत दास ( वय ३०) आणि प्रेमचंद शिबू राजवार (वय ३५) अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहे. पिंपळे-गुरव भागात महादेवाचे मंदिर बांधण्याचे काम सुरु आहे. बुधवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास मंदिराचा सभा मंडप दगडी खांबासह खाली कोसळला यावेळी या तिघांसह एक जण तिथे काम करीत होते. हे काम सुरु असतानाच सभा मंडपाचा स्लॅब त्यांच्या अंगावर कोसळला. पारंपारिक पद्धतीने या मंदिराचे बांधकाम सुरु होते, त्यासाठी एकावर एक खांबाचा भाग रचून वर चढवला जात होता.