स्टेशनरी, कटलरी अँड जनरल र्मचट्स असोसिएशनतर्फे ‘ग्राहक पेठ’चे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांना यंदाचा ‘व्यापारभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबरीने खडकी येथील ‘पूना जनरल स्टोअर्स’चे नानकचंद रावळ यांना उत्कृष्ट दुकान, ‘नया संसार’चे अशोक महाबळेश्वरकर यांना उत्कृष्ट विक्रेता, ‘ज्योती गॅस अॅप्लायन्सेस’चे प्रफुल्ल देसाई, ‘कृष्णा कलेक्शन’च्या मनीषा ठक्कर यांना उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कारांसह व्हॅनच्या माध्यमातून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या अश्विनी नामजोशी यांना साधना गोरे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. एस. एम. जोशी सभागृह येथे सोमवारी (३ जून) सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. माजी खासदार श्रीनिवास पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी याप्रसंगी उपस्थित राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अरुणसिंह परदेशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2013 रोजी प्रकाशित
सूर्यकांत पाठक यांना ‘व्यापारभूषण’ पुरस्कार
स्टेशनरी, कटलरी अँड जनरल र्मचट्स असोसिएशनतर्फे ‘ग्राहक पेठ’चे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांना यंदाचा ‘व्यापारभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-05-2013 at 02:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyapar bhushan reward to suryakant pathak