रस्ता ओलांडत असताना पीएमपी बसची धडक बसून काळेवाडी येथे एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी बसचालकाला अटक केली आहे.
मनीषा अनिल दुधाळ (वय ३३, रा. विधाते वस्ती, औंधगाव, पुणे.) असे या उपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी बसचालक आलीम बाबुमिया शेख (वय ३०, रा. साई कॉलनी, विजयनगर, काळेवाडी.) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथे धनगरबाबा मंदिरासमोरून ही महिला मुख्य रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी पीएमपीची बस (क्र. एमएच १२/ एफसी ९२७३) या रस्त्याने भरधाव येत होती. बसने महिलेला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू झाला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 16-02-2013 at 09:08 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman died in bus accident near kalewadi