नृत्य कलावंत असलेल्या तरूणीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. हडपसर भागातील गोंधळेनगर भागात मंगळवारी सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अपघातानंतर आलेल्या नैराश्यातून तीने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. विशाखा काळे (वय २४, रा. नटराज कॉलनी, गोंधळे नगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखा या नृत्य कलावंत होत्या. त्या आई-वडिल आणि बहिणीसह गोंधळे नगर भागात राहत होत्या. विशाखा आणि त्यांची बहिण इव्हेंट मॅनेजमेंट आणि नृत्याचे कार्यक्रम करीत असत. दरम्यान, विशाखा यांचा गतवर्षी नोंव्हेंबर महिन्यात अपघात झाला आणि त्यानंतर चेहºयाला मार लागल्यामुळे त्यांना कार्यक्रमात सहभागी होता येत नव्हते. त्यामुळे त्या मागील काही महिन्यापासून नैराश्यात होत्या. दरम्यान, विशाखा यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी दि. ६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तीच्या कुटुंबियांनी तीने आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती कुटुंबियांनी हडपसर पोलिसांना दिली.
