young woman commits suicide due to husband torture in pune pune print news zws 70 | Loksatta

पुणे : मद्यपी पतीच्या छळामुळे तरुणीची आत्महत्या ; पतीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा

पती तसेच त्याच्या नातेवाईकांच्या छळामुळे मुलीने आत्महत्या केल्याचे माधुरीचे वडील आनंदा कांबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे

पुणे : मद्यपी पतीच्या छळामुळे तरुणीची आत्महत्या ; पतीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा
(प्रतिनिधिक छायाचित्र)

मद्यपी पतीच्या छळामुळे तरुणीने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उत्तमनगर भागात घडली. माधुरी सुशांत वाघमारे (वय २३, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. माधुरीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पती सुशांत वाघमारे याच्यासह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माधुरीचे वडील आनंदा कांबळे (वय ४८,रा. निवृत्ती हाईट, एनडीए रस्ता, उत्तमनगर) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माधुरीचा चार महिन्यांपूर्वी सुशांत याच्याशी विवाह झाला होता. सुशांत तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. त्याला दारुचे व्यसन आहे. दारुच्या नशेत तो तिला मारहाणही करायचा.

माधुरीची सासू तिला स्वयंपाकांवरुन टोमणे मारत होते. छळामुळे माधुरी माहेरी आली. तिने निवृत्ती हाईट इमारतीच्या छतावरुन उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या माधुरीचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पती तसेच त्याच्या नातेवाईकांच्या छळामुळे मुलीने आत्महत्या केल्याचे माधुरीचे वडील आनंदा कांबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपाली लुगडे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : कोथरुडमधील गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई ; गुंड वर्षभरासाठी कारागृहात

संबंधित बातम्या

“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
पत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा; २६ वर्षांनंतर NDTV ची साथ सोडली
“घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
“जाड्या म्हशीसारखी दिसणारी मी…” ‘गीता माँ’ स्पष्टच बोलली
‘लक्ष्मी नारायण राजयोग’ तयार झाल्याने ‘या’ राशींचे भाग्य चमकणार? २०२२ च्या शेवटी मिळेल प्रचंड धनलाभाची संधी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
ऊस गाळपाची गती मंदावली, शेतकरी चिंतेत; लातूर जिल्ह्यातील चित्र
“…तर आता यांच्या पोटात गोळा यायला लागला”, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्र
“…तर तुम्ही मूर्ख, खोटारडे आणि ढोंगी आहात” उद्धव ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपांवरून राऊतांचा भाजपावर घणाघात
पुणे: गडकिल्ले संवर्धनासाठी दोन वर्षांनंतर समित्या स्थापन
पुणे: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; ट्रकची मालवाहू गाडीला धडक; सात जण जखमी