भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बुधवारी एका तरुणाला भर चौकात मारहाण केली. लग्नाचे आमीष दाखवून एका मुलीची फसवणूक केल्याप्रकरणी देसाई यांनी पुण्याच्या शिक्रापूर येथे देसाई यांनी श्रीकांत लोंढे या तरुणाला मारहाण केली. पीडित मुलीसोबत श्रीकांत लोंढे या तरुणाचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन त्याने तरुणीला दिले होते. मात्र, ऐनवेळी तरुणीची लग्न करण्यास लोंढे याने नकार दिला. पीडितेच्या तक्रारीवरून तृप्ती देसाई यांनी श्रीकांत लोंढे याला शिक्रापूर येथे भर चौकात चपलेने चोप दिला. दरम्यान, देसाई यांची ही कृती म्हणजे केवळ स्टंटबाजी असल्याचे म्हटले जात आहे. तसेच तृत्पी देसाई यांनी कायदा हातात घेऊन प्रश्न सुटणार आहेत का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jul 2016 रोजी प्रकाशित
तृप्ती देसाईंकडून तरुणाला भर चौकात मारहाण
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बुधवारी एका तरुणाला भर चौकात मारहाण केली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 27-07-2016 at 19:14 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth beaten up by trupti desai