दक्षिण ध्रुवाचा बर्फाळ प्रदेश, हाडं गोठवणारी थंडी, त्यात १३ दिवसांची संशोधनमोहीम, जगभरातले ६६ विद्यार्थी अन् त्यात भारताची एकमेव प्रतिनिधी.. ही प्रतिनिधी होती पुण्याची १९ वर्षीय विद्यार्थिनी झरीन चीमा! झरीनाने ‘स्टुडंट्स ऑन आईस २०१४’ अंतर्गत अंटाक्र्टिकावरील संशोधनमोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
‘स्टुडंट्स ऑन आईस’ ही एक कॅनेडियन संघटना आहे, जी जगभरातील विद्यार्थ्यांना पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांवर विविध शोध करण्याची संधी देते. गेल्या वर्षी जूनमध्ये या मोहिमेसाठी निवड झाल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना शोधमोहिमेचा विषय निवडायचा होता. पुण्यातील कमिन्स कॉलेजची मॅकेनिकल इंजिनियरिंगची दुसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या झरीनने ‘एलआयडीआर’ (लाईट डायरेक्शन अँड रेंजींग) हा विषय निवडला. याचा अर्थ रिमोट तंत्रज्ञानाद्वारे एखादे लक्ष्य प्रकाशित करून व त्याच्या परावर्तनाचे विश्लेषण करून अंतर कसे मोजता येईल हे पाहणे. परंतु, त्यासाठी खूपच खर्च येणार होता. इतकी मोठी रक्कम कशी
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2015 रोजी प्रकाशित
पुण्याच्या झरीनाचा अंटाक्र्टिकापार झेंडा
दक्षिण ध्रुवाचा बर्फाळ प्रदेश, हाडं गोठवणारी थंडी, त्यात १३ दिवसांची संशोधनमोहीम, जगभरातले ६६ विद्यार्थी अन् त्यात भारताची एकमेव प्रतिनिधी..
First published on: 31-01-2015 at 02:08 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zarina at antarctica