World Egg Day 2023 : “संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे” हे वाक्य तुम्ही नक्की ऐकलं असावं. दररोज तुम्ही अंडी खाता का, हे माहिती नाही पण आज मात्र तुम्ही अंडी खायलाच हवी कारण आज जागतिक अंडी दिन आहे. ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार अंडी दिन म्हणून साजरा केला जातो. अंडी आपल्या आरोग्यासाठी किती गरजेची आहे, याविषयी जनजागृती करण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो.
जागतिक अंडी दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला अंड्याची भूर्जी स्वादिष्ट कशी बनवावी, हे सांगणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना अंडाभूर्जी आवडते. आज आपण याची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.
साहित्य
- अंडे
- कांदे
- हिरवे मिरचे
- लाल तिखट
- हळद
- धनेपुड
- टोमॅटो
- जिरे
- आलं लसणाची पेस्ट
- कढीपत्ता
- मीठ
- तेल
कृती
- सुरुवातीला कांदे, हिरवी मिरच्या आणि टोमॅटो बारीक चिरुन घ्यावे
- एका कढईत तेल गरम करावे.
- तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे, कढीपत्ता, कांदे, हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट टाकावी आणि चांगले परतून घ्यावे
- त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, धनेपुड, आणि चवीनुसार मीठ टाकावे.
- त्यानंतर त्यात टोमॅटो टाकावे आणि पुन्हा एकदा चांगल्याने परतून घ्यावे.
- टोमॅटो शिजल्यानंतर त्यात अंडे फोडून कढईत टाकावे आणि परतून घ्यावे
- भूर्जी बनल्यानंतर त्यावर कोथिंबीर टाकून स्वादिष्ट अंडा भूर्जी सर्व्ह करावी.