Anda Masala Curry Recipe In Marathi: दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात नेमकं स्पेशल असं काय बनवायचं प्रश्न अनेकदा पडतो. तेव्हा आई झटपट अंड्याचं ऑमलेट किंवा भुर्जी बनवते. पण सतत अंड्याचं ऑमलेट, अंड्याची भुर्जी खाऊन कंटाळा येतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज आपण एक खास पदार्थ पाहणार आहोत ज्याचं नाव ऐकताच नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल . ज्याचे नाव आहे ‘अंडा मसाला करी’ . तर ‘अंडा मसाला करी’ नक्की कशी बनवायची आणि अगदी कमी वेळात ही रेसिपी झटपण पण झणझणीत आणि चविष्ट कशी होईल हे आपण आज जाणून घेणार आहोत.

साहित्य

  1. ३-४ उकडलेली अंडी
  2. ४० ग्रॅम कांदे, खोबरे, आले, लसुण, कोथिंबिरी चे वाटण
  3. १/2 टिस्पून हळद
  4. १ ते २ टिस्पून काश्मिरी तिखट
  5. २ टेबलस्पून ठेचलेला लसुण
  6. ५ ते ६ कडिपत्याची पाने
  7. १ टिस्पून जीरे
  8. १ ते २ टिस्पून तिखट मसाला
  9. १ के २ टिस्पून आगरी मसाला
  10. १५ ग्रॅम चिरलेली कोथिंबिर
  11. १/२ टिस्पुन गरम मसाला
  12. चविनुसार मीठ
  13. 1-2 टेबलस्पून तेल

रेसिपी

अंडा मसाला बनवण्यासाठी अंडी उकडून साल काढून मधून त्यांना कापून घ्या. छोट्या कुकरमध्ये थोड तेल गरम करून त्यात हळद, तिखट फोडणी करून अंडी परतून घ्या व काढून ठेवा. कढईत कांदे खोबरे तेलात परतून त्यातच आले लसूण, कोथिंबिर परतून थंड करून वाटण रेडी करा.

कुकरमध्ये तेल गरम झाल्यावर जीरे, ठेचलेला लसुण, कडिपत्ता परतून घ्या त्यातच काश्मिरी तिखट, लाल तिखट, आगरी मसाला मिक्स करा परता नंतर त्यात तयार वाटण मिक्स करून परता वरून कोथिंबिर टाका

सर्व मसाला मिक्स करा चविनुसार मीठ मिक्स करा गॅस स्लो करून झाकण ठेवून २-४ मिनिटे शिजवा तेल सुटल्यावर त्यात आवश्यकते नुसार गरमपाणी मिक्स करून २-४ उकळी काढा.

नंतर त्यात मसाल्यात परतलेली अंडी सोडा व उकळी काढा. तुमची अंडा मसाला करी रेडी आहे.

सव्हिंग डिश मध्ये अंडाकरी देऊन वरून कोथिंबिर टाका सोबत पोळ्या, कांदा, लिंबू देऊन डिश सर्व्ह करा

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anda masala curry recipe in marathi nonveg dish dvr