Breakfast Recipe : दररोज नाश्त्यात पोहे, उपमा, डोसा आपण खाऊन कंटाळतो. मग नाश्त्यात वेगळे काय करावे, हा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला एक हटके नाश्त्याची रेसिपी सांगणार आहोत. एक कप गव्हाच्या पिठापासून तुम्ही हा हटके नाश्ता करू शकता. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांना हा नाश्ता आवडेल. हा नाश्ता बनवायला अत्यंत सोपी आणि तितकाच स्वादिष्ट वाटतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा नाश्ता कसा बनवायचा, आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (breakfast recipe from 1 cup of wheat flour food recipe in marathi)

साहित्य

  • गव्हाचे पीठ
  • लाल मिरची
  • मीठ
  • कोथिंबीर
  • बटाटे
  • हिरवी मिरची
  • आल्याची पेस्ट
  • जिरे
  • चाट मसाला
  • मीठ
  • पांढरे तीळ
  • टोमॅटो सॉस
  • हिरवी चटणी
  • तेल
  • पाणी

हेही वाचा : Laal Mirchicha Thecha: चटपटीत, झणझणीत ‘लाल मिरच्यांचा ठेचा’; जेवणाची वाढेल रंगत; साहित्य, कृती लगेच लिहून घ्या

कृती

  • सुरुवातीला एका मोठ्या पातेल्यात एक वाटी गव्हाचे पीठ घ्या.
  • या पिठामध्ये बारीक केलेली लाल मिरची टाकावी.
  • त्यानंतर चवीनुसार त्यात मीठ टाकावे.
  • त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
  • एक मोठा चमचा तेल टाकावे.
  • त्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करावे.
  • त्यातील थोडे मिश्रण काढून टाकावे आणि उरलेल्या मिश्रणात पाणी टाकून पीठ मळून घ्यावे.
  • या पीठाला पोळीच्या पिठापेक्षा घट्ट मळावे. हे पीठ थोडावेळ बाजूला ठेवावे.
  • दोन बटाटे उकळून घ्यावे. हे बटाटे बारीक किसून घ्यावे.
  • त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकावी.
  • त्यात बारीक केलेल्या आल्याची पेस्ट टाकावी.
  • त्यानंतर त्यात जिरे, बारीक केलेली लाल मिरची, चाट मसाला, मीठ टाका आणि हे सर्व मिश्रण एकत्रित करा.

हेही वाचा : मुलांना शाळेच्या डब्यात काय द्यायचं असा प्रश्न पडलाय? मग कुरकुरीत कोबीचे कटलेट बनवा; पौष्टीक रेसिपी लगेच लिहून घ्या

  • गव्हाचे पीठ जे बाजूला काढले होते त्यात थोडे पांढरे तीळ टाका आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करा. पातळ पेस्ट तयार करा.
  • गव्हाच्या पिठापासून एक मोठी पोळी लाटा.
  • त्या पोळीवर हिरवी चटणी लावा.
  • त्यानंतर टोमॅटो सॉस लावा,
  • त्यानंतर त्यावर बटाट्याचे मिश्रण लावा.
  • त्यानंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
  • त्यानंतर पोळीला एका बाजूने उचला आणि पोळी फोल्ड करा. त्यानंतर थोडी पोळी पातळ लाटा.
  • त्याचे छोटे काप करा आणि हे काप गव्हाच्या पातळ पेस्टमध्ये बुडवून गरम तेलातून तळून घ्यावे.
  • कमी आचेवर तळून घ्यावे.
  • ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे. तुम्ही हा नाश्ता तुमच्या आवडत्या सॉस बरोबर खाऊ शकता.