Breakfast Recipes marathi: असं म्हणतात की दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अशा परिस्थितीत जर तुमच्या दिवसाची सुरुवात हेल्दी ब्रेकफास्टने झाली तर यापेक्षा चांगलं काय असू शकतं. धावपळीच्या जीवनात आपण नेहमी काहीतरी झटपट शोधण्यात व्यस्त असतो. आज आम्ही तुमच्यासाठी एक हेल्थी नाश्ता घेऊन आलो आहोत. या रेसिपीचं नाव आहे हेल्दी आटा चिला. चला तर मग याची रेसिपीही जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेल्दी आटा चिला साहित्य

पीठ

मीठ

दही

ओरेगॅनो

आले

सिमला मिरची

गाजर

बीन्स

कांदा

हिरवी मिरची

ताजी चिरलेली कोथिंबीर

एक चिमूटभर हळद

आटा चिला बनवण्याची कृती-

आटा चिला अर्थातच पिठाचा चीला बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक वाटी मैदा घ्या. या पीठात मीठ, हळद आणि दही घालून मिक्स करा.

यानंतर पाणी घालून ना जास्त पातळ ना जास्त घट्ट असे मध्यम पीठ बॅटर तयार करा. आता पीठ तयार झाल्यावर त्यात ओवा, आले, हिरवी मिरची आणि सर्व भाज्या घालून व्यवस्थित मिक्स करा.

यानंतर गॅसवर एक पॅन ठेऊन गरम करा.पॅन गरम झाल्यानंतर त्यावर थोडं तेल लावा म्हणजे तवा गुळगुळीत एकसारखा होईल.

यानंतर मोठ्या चमच्याच्या साहाय्याने पीठ तव्यावर ओतून आंबोली, उत्तपमसारखा चीला बनवा. दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.

हेही वाचा >> अगदी सहज आणि सोपी अशी मसालेदार तंदूर फ्लॉवर रेसिपी; एकदा खाल तर खातच रहाल

शिजल्यावर हिरवी चटणी आणि केचप बरोबर सर्व्ह करा. मुलांसोबत मोठ्यांनाही हा पदार्थ प्रचंड आवडेल.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Breakfast recipes make this healthy aata chila recipe for sunday breakfast srk