Dasra special Recipe: दसरा हा आनंद आणि विजयाचा सण आहे. या दिवशी आपण असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याची आठवण ठेवतो. घराघरात विजायादशमीची पूजा केली जाते, सोन्याची पाने वाटली जातात आणि नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी सगळे कुटुंबीय, मित्र मिळून एकत्र सण साजरा करतात. सणाचा गोडवा वाढवण्यासाठी खास गोड पदार्थ बनवले जातात.
दसरा हा आनंद, एकोपा व नव्या सुरुवातींचा सण आहे. या दिवशी प्रत्येक घराघरात गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. पानावर वाढलेले जेवण सुगंधी आणि समाधान देणारे असावे, अशी आपली परंपरा आहे. गोड पदार्थांशिवाय सणाला खरे तर रंगच येत नाही. पुरणपोळी, मालपुवा व श्रीखंड या तीन पदार्थांपैकी एखादा तरी दसऱ्याच्या खास जेवणात आवर्जून असतो. आज आपण या तिन्ही रेसिपींचे साहित्य व कृती जाणून घेऊया, जेणेकरून तुमच्याही घरात दसऱ्याचा गोडवा खुलून दिसेल.
१. पुरणपोळी
साहित्य
चणाडाळ – २ कप
गूळ – २ कप
वेलची पूड – १ चमचा
मैदा – २ कप
तेल – ३ चमचे
मीठ – चिमूटभर
कृती
प्रथम चणाडाळ शिजवून घ्यावी आणि ती गाळून घ्यावी. त्यात गूळ घालून हलक्या आचेवर ढवळत राहावे. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड घालून सारण तयार करावे. दुसरीकडे गव्हाचे पीठ मळून घ्यावे. लाटलेल्या पोळीमध्ये सारण भरून, ती पोळीप्रमाणे लाटावी. दोन्ही बाजूंनी तव्यावर तुपात शेकून सुवासिक पुरणपोळी तयार होते.
२. मालपुवा
साहित्य :
मैदा – १ कप
रवा – ½ कप
साखर – १ कप
दूध – १ कप
साजूक तूप – तळण्यासाठी
बडीशेप पूड – १ चमचा
वेलची पूड – १ चमचा
कृती
मैदा, रवा, साखर, बडीशेप पूड व वेलची पूड एकत्र करून, त्यात दूध घालून गुळगुळीत पीठ तयार करावे. हे पीठ साधारण अर्धा तास झाकून ठेवावे. नंतर गरम तुपात हे पीठ छोट्या लाडवांना ओततात तसे ओतावे. सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी ते परतावे. मालपुवा गरमागरम सर्व्ह करावा. वरून थोडे साखरेचा पाक टाकला, तर चव अधिक वाढले.
३. श्रीखंड
साहित्य :
दही – १ किलो
पिठीसाखर – १ ½ क
वेलची पूड – १ चमच
केशर – काही तंतू
सुकामेवा (कापून) – सजावटीसाठी
कृती
दही स्वच्छ कपड्यात रात्रभर टांगून ठेवावे, जेणेकरून त्यातील पाणी पूर्ण निघेल. दुसऱ्या दिवशी घट्ट झालेले हे दही मोठ्या भांड्यात घ्यावे. त्यात पिठीसाखर, वेलची पूड व केशराचे तंतू घालून छान फेटावे. मिश्रण गुळगुळीत झाले की, श्रीखंड तयार. वरून बदाम-काजूच्या कापांनी सजवून थंडगार सर्व्ह करावे.